आत्ताच “सांगत्ये ऐका”चा प्रयोग पाहिला. हंसा वाडकरांचं आत्मचरित्र एका तासात आणि एकटीने सादर करणं शिवधनुष्य. ते अभिनेत्री मानसी कुलकर्णी व दिग्दर्शक विश्वास सोहोनी यांनी पेलून दाखवलं. मानसी राष्ट्रीय स्तरावर जावी, इतक्या ताकदीची नटी आहे. नवी
#SmitaPatil
हंसा वाडकर या अभिनेत्रीचं दहा ते चाळीस वर्षांचं आयुष्य या सव्वा तासात मानसी जगते आणि प्रेक्षकांनाही त्याचा जिवंत अनुभव देते. त्या तासापुरती ती मानसी राहतच नाही. हा अनुभव तिने आधीही भुमिकन्या सीताच्या वेळी दिलाय. नेपथ्य, संगीत, रंगभूषा सगळंच जमून आलंय. हा अनुभव एकदा नक्की घ्या.